टिकू तलसानिया रुग्णालयात, ब्रेन स्ट्रोकमुळे तब्येत ढासळली

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता टिकू तलसानिया (७०) रुग्णालयात आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्याची तब्येत ढासळली आहे. टिकूची पत्नी दीप्ती तलसानियाने ही माहिती दिली. एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी गेला असताना रात्री आठच्या सुमारास टिकू तलसानियाची तब्येत बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या टिकू तलसानियावर उपचार सुरू आहेत, अद्याप संकट टळलेले नाही.



रात्री टिकू तलसानिया एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेला होता. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रश्मी देसाई टिकू तलसानियाच्या पायांना स्पर्श करुन आशीर्वाद घेताना दिसत आहे.



टिकू तलसानियाची कारकिर्द

टिकू तलसानियाने विनोदी अभिनेता म्हणून अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून काम केले आहे. त्याने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम केले आहे. 'कुली नंबर १' (१९९५), 'राजा हिंदुस्तानी' (१९९६), 'जुडवा' (१९९७) आणि 'हम हैं राही प्यार के' (१९९३), 'अंदाज अपना अपना' (१९९४), 'बडे मियाँ छोटे मियाँ' (१९९८), 'राजू चाचा' (२०००), 'हंगामा' (२००३), 'धमाल' (२००७) 'देवदास' (२००२) या चित्रपटांमध्ये टिकू तलसानियाने अभिनय केला आहे. 'साजन रे फिर झूट मत बोलो', 'ये चांदा कानून है', 'एक से बधकर एक' आणि 'जमाना बदल गया है' या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये टिकू तलसानियाने काम केले आहे.
Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला