मुंबई : मनोरंजनासाठी प्रेक्षकांना कॉमेडी शो पसंतीस येतात. त्यातही मराठी प्रेक्षक हास्यजत्रेसारख्या रिऍलिटी शोचे चाहते असतात. या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर या कार्यक्रमाने आणि त्यातील कलाकारांनी महाराष्ट्राचं नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही टीम नेहमीच काहीतरी वेगळं करू पाहत असते. हास्यजत्रेच्या मंचावर वेगवेगळे प्रयोग होत असतातच. अशातच आता मनोरंजन आणि रॅपचा ताळमेळ साधून हास्याचा कल्लोळ उडणार आहे. या नवीन सिझन मध्ये हास्यजत्रेची टीम प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट घेऊन येणार आहे.
‘मैं नहीं तो कौन बे’ म्हणणारी भारताची सुप्रसिद्ध रॅपर सृष्टी तावडे विनोदासोबत आपल्या रॅपच्या अनोख्या ढंगात दिसणार आहे. सृष्टी हास्यजत्रेच्या विनोदवीरांसोबत स्किट करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिक उत्सुक आहेत. आजवर तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय पण आता तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना हास्यजत्रेच्या मंचावरून पाहता येणारे.
मुंबई : विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका…
मॉस्को : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे.या युद्धात…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई : ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन पानिपत : मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणे हे माझे…
प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (१३ जानेवारी)…
मुंबई : ‘हुप्पा हुय्या’ (Huppa Huiya) या चित्रपटाच्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट…