HMPV Virus : मुंबई, गुजरातसह आता आसाममध्येही एचएमपीव्ही व्हायरसची एन्ट्री!

दिसपूर : देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणात वाढ होत आहे. असाच काहीसा प्रकार आसाममध्येही घडताना दिसत आहे. लखीमपूरमध्ये, एका १० महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली आहे. सध्या मुलाला दिब्रुगडमधील आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही.



रुग्ण संख्येत सातत्याने वाढ


आसाममधील या प्रकरणासह, देशात एचएमपीव्ही प्रकरणांची एकूण संख्या १५ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक ४ प्रकरणे आहेत. यापूर्वी गुरुवारी ३ प्रकरणे नोंदवली गेली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



सतत हात स्वच्छ धुवा, मास्क घाला


तसेच रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेत सिक्कीम सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एक सूचना जारी केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य सचिवांनी अलीकडेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागासोबत सध्याच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि राज्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. साबणाने सतत हात स्वच्छ धुवा, मास्क घाला असा सल्ला देण्यात येत आहे.(HMPV)

Comments
Add Comment

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि