HMPV संदर्भात WHO ने दिली महत्त्वाची माहिती

जिनीव्हा : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस अर्थात HMPV संदर्भात जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने महत्त्वाची माहिती दिली आहे. थंडीच्या दिवसात विशिष्ट प्रकारचे आजार हमखास पसरतात. यात प्रामुख्याने श्वसनाशी संबंधित आजार आणि निवडक संसर्गजन्य आजार असतात. चीनमध्ये सध्या थंडीच्या दिवसांतल्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णांना उपचार मिळत आहेत. घाबरण्याची आवश्यकता नाही.



चीनमध्ये इन्फ्लूएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस, ह्युमन मेटान्यूमोव्हायरस आणि कोविड १९ चा निर्माता सार्स कोव्हिड टू यापैकी किमान एखाद्या व्हायरसची बाधा झालेले रुग्ण आढळत आहेत. पण या रुग्णांना उपचार मिळत आहेत, असे WHO ने सांगितले. ही माहिती त्यांनी चीनच्या आरोग्य विभागाच्या अहवालाचा संदर्भ देत दिली. चीनने ह्युमन मेटान्यूमोव्हायरस संदर्भात वैद्यकीय आणीबाणी जाहीर केलेली नाही; असेही WHO ने सांगितले.



ह्युमन मेटान्यूमोव्हायरस अर्थात HMPV हा एक जुनाच व्हायरस आहे. साधारणपणे थंडीच्या दिवसांत हा विषाणू सक्रीय होतो. या विषाणूची ओळख पहिल्यांदा २००१ मध्ये निश्चित झाली आहे. यामुळे हा अनोळखी व्हायरस नाही.

कोरोनाच्या निमित्ताने जगाला श्वसनाशी संबंधित आजारांचा सामना करण्याचा अनुभव मिळाला आहे. यामुळे ह्युमन मेटान्यूमोव्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी नागरिक सक्षम आहेत. जशी कोरोना काळात काळजी घेतली तशीच म्हणजे हात धुणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देणे, आजारी व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे, सर्दी - खोकला येत असल्यास नाक - तोंड झाकण्यासाठी मास्क वा हातरुमाल वापरणे ही खबरदारी घेतल्यास ह्युमन मेटान्यूमोव्हायरसला हाताळणे शक्य असल्याचे WHO ने सांगितले.
Comments
Add Comment

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे