धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी पेढी परिसरात पारधी समाजाच्या दोन गटात मध्यरात्री शेतात पाणी देण्यावरून हाणामारी झाली. या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. या प्रकरणात येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयावरून दहा जणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र आहे. हत्या, बेदम मारहाण करणे, लैंगिक अत्याचार, शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवणे, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडणे, चोऱ्या, खंडणी वसुली, अपहरण हे प्रकार वाढले आहेत. यात बावी पेढी परिसरातील घटनेची भर पडली आहे.
शेतात पाणी देण्यावरून हाणामारी झाली. या हाणामारीत चार जणांना जीव जाईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर बावी पेढी परिसरात तणावाचे वातावरण आहे. मारहाण प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.