- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा
मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्कपासून वंचित राहिलेल्या मेट्रो-३ ॲक्वा लाईनच्या (Mobile Network in Metro 3 Aqua Line) प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी सामोर आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने ॲक्वा लाईनवर मोबाईल कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्यान कॉल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंटसारख्या सुविधा वापरणे शक्य होणार आहे. (Mobile Network in Metro 3 Aqua Line)
तर व्होडाफोन आयडिया (Vi) ने आरे-जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक या मार्गावरील १६ स्थानकांमध्ये सेवा सुरू केली आहे. यात सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, सीएसएमआय विमानतळ टी-२, सांताक्रूझ, बांद्रा कॉलनी, बीकेसी, धारावी, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. काही ठिकाणी उपकरणांच्या पुनर्स्थापनेचे काम सुरू असल्याने नेटवर्कमध्ये किरकोळ अडथळे येत आहेत, मात्र ते लवकरच दूर होतील. (Mobile Network in Metro 3 Aqua Line)
मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेना ...
दररोज दीड लाख प्रवाशांना फायदा :
जिओ, एअरटेल आणि Vi एकत्र :
मार्च महिन्यात एमएमआरसीएलने ॲक्वा लाईनसाठी (Mobile Network in Metro 3 Aqua Line) नवीन इन-बिल्डिंग सोल्यूशन (IBS) सेवा पुरवठादार शोधण्यासाठी निविदा काढली होती. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरसीएलने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या प्रमुख दूरसंचार कंपन्यांना एकत्र आणून कनेक्टिव्हिटी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सध्या एअरटेल आणि Vi च्या सेवा उपलब्ध झाल्या असून आगामी काही दिवसांत रिलायन्स जिओची सेवाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण ३३.५ किलोमीटर लांबीच्या ॲक्वा लाईनवर अखंड मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. (Mobile Network in Metro 3 Aqua Line)





