Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीKasara RPF : 'मरे'च्या आरपीएफ टीमने वाचवले व्यक्तीचे प्राण

Kasara RPF : ‘मरे’च्या आरपीएफ टीमने वाचवले व्यक्तीचे प्राण

मुंबई :  कसारा येथील मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात, अतुलनीय टीमवर्क, समर्पण आणि माणुसकी दाखवून महत्त्वाची भूमिका बजावली. कसारा येथील आरपीएफ पोस्टला अंकित गर्ग, वरिष्ठ विभाग अभियंता/पर्मनंट वे यांच्याकडून रेल्वे रुळांच्या बाजूने ११०/४२ या पोल क्रमांकाजवळ कोणीतरी पडल्याचा संदेश प्राप्त झाला.

आरपीएफचे उपनिरीक्षक राम लखन कुमार त्यांच्या टीमसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. टीमने त्वरीत कारवाई करून त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे त्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, त्याच्या बॅगेची नियमित तपासणी केली असता त्या व्यक्तीचे नाव सोमनाथ एकनाथ शिंदे, इगतपुरी येथील रहिवासी आणि भांडुप युनिट क्रमांक १, ट्रॅक मेंटेनर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी असल्याचे उघड झाले.

https://prahaar.in/2025/01/04/two-more-murderers-in-sarpanch-santosh-deshmukh-case-arrested-in-pune-main-accused-in-police-custody/

शिंदे यांनी तपास पथकाला माहिती दिली की, तो ड्युटीवरून घरी परतत असताना उंबरमाळी येथे उतरला होता आणि महामार्गावर उभा असताना त्याला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून लुटले, त्यानंतर त्यांनी त्याला रेल्वे रुळालगतच्या खांबाजवळ फेकून दिले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला अंतर्गत जखमा आढळून आल्या आणि त्यानुसार त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक राम लखन कुमार, हेड कॉन्स्टेबल संतोष बागुल आणि अधिकृत वाहन चालक महिपाल पंडित यांचा समावेश असलेल्या RPF च्या टीमने एकाचा जीव वाचवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. आरपीएफ टीम “जीवन रक्षक” या बिरुदावलीस पात्र ठरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -