Thane News : ट्रेकिंगसाठी येऊरच्या डोंगरात गेलेल्या युवकांवर मधमाश्यांचा हल्ला

थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला ट्रेकिंग करणे भोवले, तीन जण रुग्णालयात 


ठाणे : थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला ट्रेकिंग करणे १० युवकांना चांगलेच भोवले आहे. सोमवारी सकाळी ट्रेकिंगसाठी येऊरच्या डोंगरात गेलेल्या युवकांवर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने भेदरलेले हे युवक डोंगरात अडकून पडले. सुदैवाने, या घटनेवी कुणकुण लागल्याने वर्तकनगर पोलीस, टीडीआरएफ जवान आ ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव पथकाने सर्व युवकांची सुटका केली. मात्र, मधमाश्यांच्या हल्यात सर्वजण जखमी झाले असून यापैकी सात जणांना पालकांच्या स्वाधीन केले अाहे. तीन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.



ठाण्याच्या लगत असलेल्या येऊर येथे भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या डोंगरावर सोमवारी सकाळच्या सुमारास दहा युवक ट्रेकिंगसाठी गेले होते. जंगलात त्यांचा रस्ता चुकला. जवळपास ४ किलोमिटर हे युवक जंगलात गेले होते. तेव्हा, अचानक मधमाश्यांचे मोहोळ उठले. मधमाश्यांच्या भीतीमुळे ही मुले सैरावरा पळू लागली. मधमाश्यांनी सर्वांवर हल्ला चढवल्याने भरकटलेले युवक तिकडेच अडकले होते. यापैकी एकाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात फोन करून आम्ही अडकलो असल्याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी ताबडतोब सूत्रे हलवली. ठाणे महापालिकेचा आपत्ती विभाग, टीडीआरएफ जवानाच्या टीमने डोंगराकडे कुच केली. त्यानंतर तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर या युवकांची सुखरूप सुटका झाली.



डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची नावे


ऋषी घोसाळकर (१८) रा. चेंदणी कोळीवाडा, कोपरी, ठाणे (पू.), समर्थ मयेकर (१८) रा. घणसोली, नवी मुंबई, प्रणव परब (१८ वर्षे) रा. विक्रोळी, मुंबई, वरद बासा (१८ वर्षे) रा. विक्रोळी, मुंबई, सोहम देशमुख (१८ वर्षे ) रा. वैशाली नगर, श्रीनगर, ठाणे, कुणाल पानमंद (१८ वर्षे) रा. घाटकोपर, मुंबई, तन्मय नाईक (१८) रा. मुलुंड, मुंबई, रोहन घरुड (१८) रा. मुलुंड, मुंबई, अलोक यादव (१८) रा. कळवा, ठाणे, आर्य यादव (१८) रा. कांजूरमार्ग, मुंबई.

Comments
Add Comment

कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच भाजपाला मोठे यश

ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा

ठाणे : ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवी (गावदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२६

मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक

युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि

ठाण्यात घराणेशाहीचा वाद चिघळला

खा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

कडोंमपा निवडणुकीसाठी महायुतीत धुसफूस

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडकीस

अवयवदानातून मिळाले ६ रुग्णांना जीवदान

ठाणे : ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे.