Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीUniversity Exam Date : विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! 'या' तारखेपासून सुरू होणार अभियांत्रिकी,...

University Exam Date : विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! ‘या’ तारखेपासून सुरू होणार अभियांत्रिकी, लॉ, फार्मसी, बीएड, एमएडची परीक्षा

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसह अभियांत्रिकी, फार्मसी, लॉ, बीएएड, एमएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या दिवसातच ही परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागा असे आवाहन करण्यात येत आहे.

वैवाहिक जीवन राहील आनंदी, जोडप्यांनी लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पदव्युत्तर पदवीसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला आहे. आता चालू शैक्षणिक वर्षात पदवीसाठीही हे धोरण लागू केले आहे. त्यानुसार येत्या १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.

दरम्यान, परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार किंवा कॉपी न होण्यासाठी विद्यापीठाने विशेष काळजी घेतली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन भरारी पथके नेमली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -