मुंबई: लग्न हे एक असे बंधन आहे जे मजबूत ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रेम आणि सन्मानाची गरज असते. लग्नाच्या नात्यात विश्वास आणि पारदर्शकता महत्त्वाची असते. एकमेकांशी खुलेपणाने बोलणे आणि आपल्या भावना एकमेकांशी शेअर करणे खूप गरजेचे आहे. वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी पती आणि पत्नी दोघांनाही प्रयत्न करणे गरजेचे असते. खासकरून अशा काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते ज्यामुळे नाते अधिक मजबूत होईल.
छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका
लग्नानंतर पती-पत्नी २४ तास एकमेकांसोबत असतात अशातच त्यांच्यात थोडे बेबनाव होणे स्वाभाविकच आहे. मात्र एकमेकांचे बोलणे मनावर घेतले तर गोष्टी वाढतात. असे सतत केल्याने तुमचे नाते बिघडू शकते आणि दोघांच्या नात्यात तणाव येऊ शकतो. यासाठी लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि आपसात प्रेम वाढू द्या.
असहमतीचे स्वागत करा
कधी कधी असे घडते की जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याशी सहमत नसते. अशातच त्याच्या असमहतीचेही स्वागत केले पाहिजे. तसेच समोरच्याचे ऐकून घेतला पाहिजे. आपल्या जोडीदाराने आपल्याशी सहमतच झाले पाहिजे हे गरजेचे नाही. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत एकमेकांपेक्षा वेगळी असते. जर एखाद्या गोष्टीवरून वाद झाला असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर आरोप लावू नका.
एकमेकांच्या वाढीला प्रोत्साहन द्या
वैवाहिक जीवनात एका जोडीदाराने नेहमी दुसऱ्या प्रती जबाबदार असले पाहिजे. नेहमी त्याचे करिअर, आरोग्य आणि प्रत्येक कामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ही दोघांची जबाबदारी आहे की त्यांनी एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमच्या जोडीदाराचीही काही स्वप्ने असतील जी पूर्ण करणे दोघांची जबाबदारी आहे. लग्नानंतर जोडीदाराचे स्वप्न आपले बनवा.