पुणे : पीएमपीडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त मोफत विशेष बससेवा (PMP Free Bus Service) देण्यात येणार आहे. मंगळवार ३१ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून बुधवारी १ जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत बससेवा सुरू असणार आहे. त्यासाठी लोणीकंद विभाग आणि शिक्रापूर विभागातून विविध मार्गांवरून बस धावणार असून, अनुयायांना सुलभ प्रवास करता येणार आहे, अशी माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली.
कोरेगाव भीमा येथे नववर्षारंभी विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यासाठी देशभरातून आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. अनुयायांची वाढती संख्या ध्यानात घेऊन इच्छितस्थळी जाण्यासाठी ‘पीएमपी’कडून दर वर्षी मोफत बससेवा देण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही सेवा देण्यात येत आहे.
Railway Jobs : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक
काय आहेत मार्ग?
लोणीकंद विभागामार्फत मंगळवारी दुपारी चार ते पहाटे चार वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचवन, फुलगाव शाळा आणि पेरणे गावापर्यंत ७५ मोफत बसचे नियोजन करण्यात आले आहे, तर बुधवारी पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत २५० बस याच मार्गांवरून धावणार आहेत.
शिक्रापूर विभागातून मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप चाकण रस्ता ते कोरेगाव भीमा विजयस्तंभापर्यंत १४० बस मार्गावर असतील. त्याचबरोबर वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल ते वढूपर्यंत दहा बसचा वेगळा मार्ग असणार आहे, तर बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ३५० बस याच मार्गावरून धावणार आहेत. (PMP Bus Travel)
कसे असेल बसचे नियोजन?
पुणे रेल्वे स्थानक मोलेदिना बसस्थानक – ३१ जादा बस
मनपा भवन बसस्थानक – ३३ जादा बसव
दापोडी मंत्री निकेतन – ०२ जादा बस
ढोले पाटील रस्ता मनपा शाळा – ०२ जादा बस
अप्पर डेपो बसस्थानक – ०४ जादा बस
पिंपरी आंबेडकर चौक – ०३ जादा बस