FIFA World Cup 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष या महास्पर्धेकडे लागले आहे. प्रत्येक संघाचे स्वप्न असते ते म्हणजे प्रतिष्ठेची फिफा विश्वचषक ट्रॉफी (FIFA World Cup Trophy) उंचावण्याचे. मात्र, ही ट्रॉफी (Trophy) नेमकी किती किमतीची आहे, याबाबत अनेकांना उत्सुकता असते.
फिफा विश्वचषक ट्रॉफीची (FIFA World Cup Trophy) किंमत किती?
सध्या ट्रॉफीमध्ये वापरण्यात आलेल्या सोन्याच्या आणि इतर साहित्याच्या मूल्यानुसार तिची किंमत सुमारे २.३८ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र, क्रीडा इतिहासातील तिचे महत्त्व, दुर्मिळता आणि जागतिक प्रतिष्ठा लक्षात घेता, जर ही मूळ ट्रॉफी कधी लिलावासाठी ठेवली गेली तर तिची किंमत 190 कोटी रुपयांपेक्षा अधिक (२० दशलक्ष डॉलर) जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ट्रॉफी कशापासून बनवली आहे?
फिफा विश्वचषक ट्रॉफीची उंची ३७ सेंटीमीटर असून तिचे वजन सुमारे ६ किलो आहे. ही ट्रॉफी १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. ट्रॉफीवर दोन मानवी आकृती पृथ्वीला उंचावताना दाखवण्यात आल्या आहेत, जे फुटबॉलच्या जागतिक लोकप्रियतेचे प्रतीक मानले जाते.
मेक्सिको (Mexico vs South Africa FIFA World Cup 2026) : फुटबॉल (Football) चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेला शानदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील ...
विशेष म्हणजे, ही ट्रॉफी पूर्णपणे घन सोन्याची नाही. तिचा आतील भाग पोकळ असल्यामुळे ती तुलनेने हलकी आहे आणि विजेत्या खेळाडूंना ती उचलणे सोपे जाते. ट्रॉफीच्या तळाशी मालाकाइट (Malachite) या हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान खनिजाचे दोन थर लावण्यात आले आहेत.
ट्रॉफीची रचना कोणी केली?
सध्याच्या फिफा विश्वचषक ट्रॉफीची रचना इटलीचे प्रसिद्ध शिल्पकार सिल्विओ गाझानिगा (Silvio Gazzaniga) यांनी १९७० मध्ये केली होती. त्यावेळी फिफाने आंतरराष्ट्रीय स्तरावर डिझाइन स्पर्धा आयोजित केली होती.
ही ट्रॉफी पूर्वीच्या ज्युल्स रिमे ट्रॉफी (Jules Rimet Trophy) ची जागा घेण्यासाठी तयार करण्यात आली. ब्राझीलने १९७० मध्ये तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर ज्युल्स रिमे ट्रॉफी कायमस्वरूपी ब्राझीलला देण्यात आली होती. त्यानंतर सध्याची ट्रॉफी प्रथम पश्चिम जर्मनीने १९७४ मध्ये जिंकली.
मुंबई : मुंबई टी२० लीगमध्ये (T20 Mumbai League) यंदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) तीन नामांकित कर्णधार (Captain) वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व ...
विजेत्या संघाला मूळ ट्रॉफी मिळते का?
नाही. फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मूळ ट्रॉफी कायमस्वरूपी दिली जात नाही. अंतिम सामन्यानंतर मूळ ट्रॉफी पुन्हा फिफाकडे सुरक्षित ठेवली जाते.
विजेत्या संघाला त्याऐवजी सोन्याचा मुलामा दिलेली कांस्य प्रतिकृती (Gold-Plated Bronze Replica) प्रदान केली जाते. त्यामुळे जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा ट्रॉफींपैकी एक असलेली ही ट्रॉफी भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहते.
पैशांपेक्षा अधिक आहे ट्रॉफीचे महत्त्व
फिफा विश्वचषक ट्रॉफीची आर्थिक किंमत कितीही असली तरी तिचे खरे मूल्य हे पैशांत मोजता येणार नाही. ही ट्रॉफी म्हणजे फुटबॉलमधील सर्वोच्च यश, राष्ट्रीय अभिमान आणि क्रीडा इतिहासात अमर होण्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच प्रत्येक खेळाडू आणि चाहत्यासाठी विश्वचषक ट्रॉफी उंचावणे हे सर्वोच्च स्वप्न मानले जाते.




