पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरात सीएनजी दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात होणाऱ्या चढ-उतारामुळे एमएनजीएलने सीएनजीच्या दरात १.१० रुपये प्रति किलो दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना महागाईचा मोठा फटका बसत नसला तरीही त्यांच्या बजेटवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वर्षअखेर आणि नववर्ष या काळात विदेशी पर्यटकांची त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी सीएनजीची किंमत प्रति किलो ८७.९० इतकी होती. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने पुण्यातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या दरात मध्यरात्रीपासून प्रति किलो १.१० रुपयांनी वाढ केली आहे. आता पुण्यात सीएनजीचे दर ८९ रुपये प्रति किलो इतके झाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने याबाबत प्रसिद्ध पत्रक जारी केले असून यामध्ये, आयात नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली झपाट्याने वाढ आणि बाजारातील दरांवर आधारित पुरवठा याचं संतुलन करण्याचे मोठं आव्हान असल्याचे म्हटले आहे. तसेच या वाढीमध्ये उत्पादन शुल्क आणि राज्य व्हॅटचा १५ टक्के समावेश असल्याचे सांगितले आहे.