यंदाच्या खरीप हंगामावर अल-निनोच्या प्रभावाची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे राज्यात कमी व असमान पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व वादळी पावसाच्या आधारे पेरणी करण्याची घाई करू नये, असे महत्त्वाचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (Impact of El Nino)
मुंबई : कलिना येथील १८४ एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेली एअर इंडियाची ऐतिहासिक कर्मचारी वसाहत (स्टाफ कॉलनी) अखेर पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. एअर ...
हवामानातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज, पावसाची स्थिती आणि मातीतील ओलावा यांचा विचार करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. (Impact of El Nino)
घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला :
सध्या बाजारात सोयाबीन बियाण्यांच्या किंमती वाढलेल्या असल्याने शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करण्याऐवजी स्वतःकडे उपलब्ध असलेल्या घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता समाधानकारक असल्यास त्यावर योग्य बीजप्रक्रिया करून वापर केल्यास खर्चात बचत होऊ शकते. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासही मदत मिळते. (Impact of El Nino)
मुंबई : पुढील २ दिवसांमध्ये केरळसह तमिळनाडूमध्ये मान्सून धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाला पोषक वातावरण असून आज ६ जिल्ह्यांमध्ये ...
सोयाबीनसाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करा :
हवामान पाहूनच निर्णय घ्या :
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, यंदाच्या हंगामात हवामानातील बदलांचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच पेरणीचे नियोजन करावे. हवामानाचा अंदाज, पावसाचे प्रमाण आणि जमिनीतील ओलावा यांचा अभ्यास करून योग्य वेळी पेरणी केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल आणि उत्पादनातही वाढ होईल. कृषी तज्ज्ञांच्या मते, अल-निनोच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगून केलेले नियोजन हेच यंदाच्या खरीप हंगामातील यशाचे मुख्य सूत्र ठरणार आहे. (Impact of El Nino)






