नाशिक : भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा नेहमीच पाश्चात्त्य देशांवरती राहिला आहे. त्यामुळे यावेळी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक मधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढू लागली आहे. मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक या ठिकाणी नववर्ष व वर्षा अखेर साजरा करण्यासाठीदाखल होऊ लागलेले आहेत.
वर्षा अखेर व नववर्षाकाळात त्रंबकेश्वरमध्ये विदेशी पर्यटक फॉरेनर देखील भेट देत असतात. भारतीय हिंदू संस्कृती या पर्यटकांना आकर्षण असते. असे विदेशी पर्यटक भारतातच मोठ मोठ्या शहरात राहतात परंतु देवदर्शनासाठी त्रंबकेश्वर मध्ये येतात. असे पर्यटक नाममात्र संख्येने येतात. परंतु त्रंबकेश्वर मध्ये मोठ्या सुविधा नसल्याने येथे न थांबता देवदर्शन आटपून निघून जातात.काही पर्यटक मंदिरात जात नाही. त्यांना पर्याप्त सुविधा उचित मार्गदर्शन त्रंबकेश्वर नगरीत मिळत नाही. विदेशी पर्यटक देखील त्रंबकेश्वरी मोठ्या संख्येने आले पाहिजे या दृष्टीने येथे नियोजन होणे गरजेचे आहे.
दरम्यान, नाताळ सुट्टी मुळे यात्रेकरूंची गर्दी आहे कुशावर्त तीर्थ गंगा गोदावरी मंदिरात देखील आता भाविकांची गर्दी असते. गंगा गोदावरी मंदिरात साडी चोळी देवून गोदावरीची ओटी देखील यात्रेकरू महिला भाविक भारतात. फोटोत महिला भाविकाने दिलेली साडी चोळी गोदावरी मूर्तीला पायाला लावून मूर्ती जवळ ठेवताना पुजारी दिसत आहे.गोदावरी मातेची ख्याती आता अधिकच वाढत आहे असे दिसते.