Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Airport : मुंबई विमानतळावर १६ तास प्रवाशांचे हाल

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर १६ तास प्रवाशांचे हाल

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे.प्रवाशांना तब्बल १६ तास विमान उड्डाणाची वाट पाहावी लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.मुंबईतून इस्तांबूलला जाणारे सकाळी ६.३० वाजताचे विमान ८ तासानंतर थेट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रवाशांच्या माहितीनुसार, मुंबईहून इस्तंबूलला जाणारं हे विमान शनिवारी सकाळी ६.५५ ला टेकऑफ करणार होतं. सकाळी ८.२० पर्यंत विमानाचं टेक ऑफ होईल अस आधी सांगण्यात आलं. त्यानंतर साडे नऊ वाजता सर्व प्रवाशांना बोर्ड करण्यात आलं आणि विमानतळावरच बसवून ठेवलं गेलं. तास-दीड तास बसवल्यानंतर पुन्हा त्यांना एग्जिट घ्या असं सांगण्यात आलं. आता, अखेर साडे सोळा तासांनी रात्री ११.०० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याचे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांनी पुन्हा साडेबारा वाजता विमानात बसवण्यात आलं.हे प्रवास रद्द का याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांची एयरपोर्ट मॅनेजर आणि इंडिगोच्या मॅनेजरला संपर्क साधण्याच प्रयत्न केला पण अद्याप काही उत्तर मिळालेलं नाही, असं प्रवाशांनी सांगितलं आहे. दरम्यान, या विमानानं १०० प्रवासी प्रवास करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इस्तंबूलमध्ये वातावरण थंड असल्यानं प्रवाशी थंडीचे कपडे घालून विमानात बसले होते पण विमानात बसवल्यानंतर दीड तास विना एसी बसून राहिले. पण आता प्रवाशांना सांगण्यात आलं आहे की हे विमान रद्द करण्यात येत आहे, मिळालेल्या माहितीनुसार कळते आहे.

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध

आम्हाला खेद आहे की आमची फ्लाइट 6E17, मूळात मुंबई ते इस्तंबूलला चालवायची होती. मात्र, तांत्रिक समस्यांमुळे विमानसेवेला उशीर झाला. दुर्दैवाने, ही समस्या दुरुस्त करून ती गंतव्यस्थानी पाठवण्याचे आमचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही, अखेरीस आम्हाला फ्लाइट रद्द करावी लागली, असे एअरलाईन्सने म्हटले आहे. कंपनीकडून आमच्या प्रवाशांना मदत व सहाय्य प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, निवास, जेवण आणि संपूर्ण परतावा यासारख्या उपायांची व्यवस्था करू. आमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचण सोडवणे शक्य न झाल्याने विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकली नाही. दरम्यान, कंपनीकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता ते रात्री ११ :०० वाजता मुंबईतून रवाना होईल. आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की त्यांची सुरक्षितता हे आमच्यासाठी प्राधान्यवत आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -