Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBeed Muk Morcha : ‘पंकुताई संतोषच्या घरी का नाही गेला’? मूक मोर्च्यात...

Beed Muk Morcha : ‘पंकुताई संतोषच्या घरी का नाही गेला’? मूक मोर्च्यात सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल; तर धनुभाऊ बोगस मतांनी जिंकल्याचा धसांचा आरोप

बीड : बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा (Beed Muk Morcha) आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यात खासदार संभाजीराजे छत्रपती, भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या मोर्च्यात बोलताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी जोरदार फटकेबाजी करत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. ही पद्धत चुकीची आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार कोणालाही मुंगी मारण्याची परवानगी नाही. संतोष देशमुख तीन टर्मचा सरपंच होता. दोनदा जनतेतून निवडणून आला आणि एक वेळा बॉडीतून निवडून आला होता, असे सुरेश धस म्हणाले.

Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरण मुंबईला वर्ग करा, बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश!

पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मी ८० हजार मतांनी निवडून आलो. मात्र धनु भाऊ तुम्ही १ लाख ४२ हजार मतांनी निवडून आलात. ३३० बुथांपैकी २३० बुथ ताब्यात असतील तर हेच होणार. तुम्ही बोगस मतांनी जिंकून आले आहे, असा आरोप देखील यावेळी बोलताना सुरेश धस यांनी केला.

गोली मार भेजे में, भेजा जो करता हैं, असे गाणे सत्या पिक्चरमध्ये आहे. मात्र बीड जिल्ह्यात गोली मार किधर भी हो गया. जिल्ह्यात १२००-१३०० लायसन्स ज्या जिल्ह्याधिकारींनी दिले आणि ज्या पोलीस अधीक्षकांनी त्याला समर्थन दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही आमदार सुरेश धस म्हणाले. तसेच या प्रकरणातील मुख्य आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

तर पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत सुरेश धस म्हणाले की, पंकूताई माझा सवाल आहे की, तुम्ही संभाजीनगर एअरपोर्टला उतरला. १२ डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा दिवस आहे. मात्र तुम्ही वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का नाही गेला? असा सवाल आहे माझा, असे सुरेश धस म्हणाले. तसेच पंकजा मुंडे तुम्हाला चांगली माणसं कळत नाहीत. तुम्हाला फक्त जी हुजूर जी हुजूर करणारी माणसं पाहिजेत, असा टोला देखील त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना लावला.

धस यांच्या रडारवर पुन्हा ‘आका’; एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार! दोन पोलीस अधिकारीही गुंतल्याचा आरोप

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -