जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसनराव नजन पाटील यांनी आता शेतीत एक अनोखा आणि चर्चेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील शेतात जपानमधील अत्यंत महागडा आणि दुर्मिळ समजला जाणारा ‘मियाझाकी’ आंबा लावला असून यंदा प्रथमच या झाडांना फळधारणा झाली आहे. (World's Most Expensive Mango)
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला तब्बल २.८७ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्याची घोषणा केली आहे. जागतिक ...
काळजीपूर्वक निगा, हवामानानुसार व्यवस्थापन आणि योग्य खतपाण्यामुळे यंदा प्रथमच या झाडांना मोहोर आला आहे. सध्या तीन झाडांवर तब्बल २२ आंबे लागले असून पुढील काही दिवसांत हे आंबे पूर्णपणे परिपक्व होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मियाझाकी आंब्याची लागवड फारच कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. (World's Most Expensive Mango)
मियाझाकी आंबा हा मूळ जपानमधील अत्यंत प्रीमियम वाण मानला जातो. त्याचा रंग लालसर-जांभळा असून आकर्षक चमक ही त्याची खासियत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा ‘एग ऑफ सन’ या नावाने ओळखला जातो. गोडवा, सुगंध आणि पोषणमूल्यांमुळे या आंब्याला मोठी मागणी आहे. (World's Most Expensive Mango)
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरची मर्यादा या विषयावर सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी सुरू होती. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित ...
पोलीस सेवेनंतर निवांत आयुष्य निवडण्याऐवजी आधुनिक शेतीत नवे प्रयोग करण्याचा मार्ग स्वीकारत किसनराव नजन पाटील यांनी अनेकांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीसोबत उच्च मूल्य असलेल्या फळपिकांकडे वळल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. (World's Most Expensive Mango)






