मुंबई : नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की सगळ्यात पहिला आपण गणेशोत्सव, आपला वाढदिवस, त्याचबरोबर रविवारी कोणता सण आला नाही ना हे सगळ्यात पहिल्यांदा पाहून घेतो. तर यंदा २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, रामनवमी, मोहरम यांसारखे सण रविवारी येणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने ४ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे २०२५ या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्या (List of holidays) जाहीर केल्या आहेत. (Maharashtra Holiday List 2025) १८८१ च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम २५ द्वारे आधारित, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे वर्षभर विशिष्ट दिवशी सुट्ट्या देतात. महाराष्ट्रात फक्त बँकांना त्यांची वार्षिक खाती (Annual accounts) बंद करण्यासाठी मंगळवार, दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सुट्टी असेल. पण, सरकारी कार्यालयांना या सुट्टीतून सूट देण्यात आली आहे.
Papaya And Cotton Price Fall : कापसाचे दर गडगडले, पपईलाही मिळतोय कवडीमोल भाव; उत्पादक शेतकरी अडचणीत!
महाराष्ट्र सरकारने २४ सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त २३ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी भाऊबीज, ही पुढील संस्थांसाठी अतिरिक्त सुट्टी म्हणून घोषित केली आहे. त्यामध्ये…
१. राज्यातील सरकारी कार्यालये
२. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
३. महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्टयांची यादी
क्रमांक |
सुट्टी |
तारीख |
दिवस |
१. | प्रजासत्ताक दिन | २६ जानेवारी २०२५ | रविवार |
२. | छत्रपती शिवाजी महाराज जयंती | १९ फेब्रुवारी २०२५ | गुरुवार |
३. | महाशिवरात्री | २६ फेब्रुवारी २०२५ | बुधवार |
४. | होळी (दुसरा दिवस) | १४ मार्च २०२५ | शुक्रवार |
५. | गुढीपाडवा | ३० मार्च २०२५ | रविवार |
६. | रमजान-ईद | ३१ मार्च २०२५ | सोमवार |
७. | राम नवमी | ६ एप्रिल २०२५ | रविवार |
८. | महावीर जन्मकल्याणक | १० एप्रिल २०२५ | गुरुवार |
९. | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | १४ एप्रिल २०२५ | सोमवार |
१०. | गुड फ्रायडे | १८ एप्रिल २०२५ | शुक्रवार |
११. | महाराष्ट्र दिन | १ मे २०२५ | गुरुवार |
१२. | बुद्ध पौर्णिमा | १२ मे २०२५ | सोमवार |
१३. | बकरी ईद | ७ जून २०२५ | शनिवार |
१४. | मोहरम | ६ जुलै २०२५ | रविवार |
१५. | स्वातंत्र्य दिन | १५ ऑगस्ट २०५ | शुक्रवार |
१६. | पारसी नववर्ष | १५ ऑगस्ट २०२५ | शुक्रवार |
१७. | गणेश चतुर्थी | २७ ऑगस्ट २०२५ | बुधवार |
१८. | ईद-ए-मिलाद | ५ सप्टेंबर २०२५ | शुक्रवार |
१९. | महात्मा गांधी जयंती | २ ऑक्टोबर २०२५ | गुरुवार |
२०. | दसरा | २ ऑक्टोबर २०२५ | गुरुवार |
२१. | दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन ) | २१ ऑक्टोबर २०२५ | मंगळवार |
२२. | दिवाळी (बलिप्रतिपदा) | २२ ऑक्टोबर २०२५ | बुधवार |
२३. | गुरु नानक जयंती | ५ नोव्हेंबर २०२५ | बुधवार |
२४. | ख्रिसमस | २५ डिसेंबर २०२५ | बुधवार |
१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे हिंदुंचे सर्व सण
भोगी, सोमवार १३/०१/२०२५
मकरसंक्रांत, मंगळवार १४/०१/२०२५
श्रीगणेश जयंती, शनिवार ०१/०२/२०२५
महाशिवरात्री, बुधबार २६/०२/२०२५
एकादशी, सोमवार १०/०३/२०२५
होळी, गुरुवार १३/०३/२०२५
धूलिवंदन, शुक्रवार १४/०३/२०२५
गुढीपाडवा, रविवार ३०/०३/२०२५
वटपौर्णिमा, मंगळवार १०/०६/२०२५
नागपंचमी, मंगळवार २९/०७/२०२५
नारळी पौर्णिमा, शुक्रवार ०८/०८/२०२५
रक्षाबंधन, शनिवार ०९/०८/२०२५
श्रीकृष्ण जन्माष्टमी, शुक्रवार १५/०८/२०२५
श्रीगणेश चतुर्थी, बुधवार २७/०८/२०२५
गौरी विसर्जन, मंगळवार ०२/०९/२०२५
अनंत चतुर्दशी, शनिवार ०६/०९/२०२५
महालयारंभ, सोमवार ०८/०९/२०२५
घटस्थापना, सोमवार २२/०९/२०२५
दसरा, गुरुवार ०२/१०/२०२५
धनत्रयोदशी, शनिवार १८/१०/२०२५
अभ्यंगस्नान, सोमवार २०/१०/२०२५
भाऊबीज, गुरुवार २३/१०/२०२५
तुलसी विवाहारंभ, रविवार ०२/११/२०२५
त्रिपुरारी पौर्णिमा, बुधवार ०५/११/२०२५
देव दीपावली, शुक्रवार २१/११/२०२५
श्रीदत्त जन्मोत्सव, गुरुवार ०४/१२/२०२५