Thirty First Party : थर्टी फस्ट'च्या पार्टीवर पोलिसांची करडी नजर!

नाशिक : नवीन वर्षाला (New Year) सुरुवात होण्यासाठी दोन आठवडे उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक असतात. यावेली अनेकजण ३१ डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस जल्लोषात (31st Party) जागवतात. बहुतांश नागरिक मित्र किंवा परिवारासोबत पार्टीचे बेत आखतात. त्यात मद्यसेवन, मांसाहार मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र या पार्टीनंतर अनेक ठिकाणी अपघात किंवा घातपात होण्याची शक्यता असते. यामुळे आता शहर व ग्रामीण पोलिस सतर्क झाले असून थर्टी फस्ट'च्या पार्टीवर पोलिसांची करडी (Police On Action Mode) नजर असणार आहे.



ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिस ठाणेनिहाय तसेच स्थानिक गुन्हे शाखेतर्फे तसेच साध्या वेशातील पोलिसांमार्फत पार्ट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच पोलिस ठाणेनिहाय हॉटेल, बार, रेस्टॉरंट, कॅफेचालकाना सूचना दिल्या असून रात्री उशिरापर्यंत वाहन तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर यावेळी ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमही शहरात राबवली जाणार आहे. (Thirty First Party)

Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द