विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक १९ डिसेंबरला 

  102

नागपूर : मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर या दिवशी होणार आहे, अशी घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी १७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. यंदाच्या अधिवेशनात  विधान परिषदेच्या सभापतीची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार आता ही निवडणूक होणार आहे.


राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केला. त्यानुसार १९ डिसेंबर रोजी मतदान होईल. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.


वास्तविक रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे; मात्र आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद भरले जाईल, अशी चर्चा चालू आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपकडे आहे, तर विधान परिषदेचे उपसभातीपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक

मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत!

आंदोलनासाठी एक दिवसाच्या मुदतवाढीनंतर जरांगेची प्रतिक्रिया मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil )

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

अहिल्यानगर: आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न