नागपूर : महायुतीच्या नवनिर्वाचित सरकारमधील 39 सहकाऱ्यांचा शपथविधी सोहळा आज, रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या लोकप्रतिनिधींना राजभवनात पद व गोपनियतेची शपथ दिली.
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह १२ जणांना मंत्रिपदे मिळली आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह १० खाती मिळणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या 6 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय. नागपुरात झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपच्या १९ शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला असून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. भाजपतर्फे शपथ घेणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये आमदार नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे ,जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे.
शिवसेनेतर्फे शपथ घेणाऱ्यांमध्ये उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भूसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट यांचा समावेश आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…