गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावर बिघाड, तर बसगाड्यांच्या संख्येतही कपात
मुंबई : एकीकडे मध्य रेल्वेचे वेळापत्रक दिवसभरात गडबडले असतानाच संध्याकाळी गर्दीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हार्बर मार्गावरील गाडीत तांत्रिक बिघाट झाल्यामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली त्याचा परिणाम रात्री उशिरापर्यंत दिसून आला. तसेच सोमवारी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातानंतर सतर्क झालेल्या कंत्राटदारांनी कमी प्रमाणात बेस्ट बस रस्त्यावर काढल्याने मुंबई शहरातील बस सेवा ही कमी झाली आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
Anganwadi Jatra : आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी!
दिवसेंदिवस मुंबईकर चाकरमान्यांसाठी प्रवास हा खूप तापदायक ठरत चालला आहे. आज दिवसभर कोणतेही कारण नसताना मध्य रेल्वे या पाच-दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या त्यात संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुन वाशी कडे जाणाऱ्या लोकल गाडीच्या पेंटाग्राफ मध्ये तांत्रिक बिघाड झाला . त्यामुळे ती प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरच अडकून पडली. त्यामुळे हार्बर मार्गावरील सेवा ही प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरूनच सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे हार्बर मार्गावर रेल्वे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्वरित रेल्वेचे कर्मचारी येऊन त्यांनी दुरुस्त केल्यानंतर सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी रेल्वे रवाना करण्यात आली तोपर्यंत हार्बर मार्गाचे तीन तेरा वाजले होते. रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने तसेच कर्मचाऱ्यांची सुटण्याची वेळ झाल्यामुळे सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती त्यात विशेष करून कुर्ला, वडाळा स्थानकात तर हार्बर मार्गावरील रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची अतोनात गर्दी झाली त्यात ज्येष्ठ नागरिक महिला यांचे प्रचंड हाल झाले. तर दुसरीकडे सोमवारी कुर्ला येथे बेस्ट बस चा अपघात घडला होता त्यात सात जण मृत्युमुखी व पन्नासच्या अधिक लोक जखमी झाले होते .
आज तिसऱ्या दिवशीही कुर्ला स्थानक पश्चिम येथून बस स्थानकातून सुटणारी बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कुर्ला स्थानक पश्चिम हे महत्त्वाचे जंक्शन असल्यामुळे येथून वांद्रे कुर्ला संकुल विद्यानगरी कमानी साकीनाका येथे जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे येथील बस स्थानकातून सुटणारे पंधरा बस मार्ग बेस्ट प्रशासनाने गेले तीन दिवस बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत . त्यात रिक्शा वाल्यांनी प्रचंड लूट सुरू केल्यामुळे आता तरी येथील बस सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवासी करत असले तरी वाहतूक पोलिसांनी कायदा व सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही असे बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले त्यामुळे नाईलाजाने बस मार्ग हे कुर्ला आगार व बुद्ध कॉलनी येथून सोडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सोमवारी घडलेल्या अपघातानंतर बेस्ट प्रशासनही सतर्क झाले असून कंत्राटदारांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अपघात घडला असला तरी बेस्ट प्रशासनावर हे प्रकरण चांगलेच शिकले आहे . त्यामुळे आता बेस्ट प्रशासनही सतर्क झाले असून त्यांनी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्यामुळे कंत्राट कंत्राटदारांचे कर्मचारी गैरहजर राहत आहेत त्यामुळे रस्त्यावर उतरणाऱ्या बस गाड्यांची संख्या कमी झाल्याने बस प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत आहे . त्यामुळे आधी रेल्वेचा नकोस तर प्रवासानंतर नंतर होणारी गैरसोय, पायपीट व बससाठी तात्काळने प्रवाशांच्या नशिबी येत आहे त्यामुळे नोकरदार प्रवासी चांगलाच हैराण झाला आहे.