Road Side Dogs : केडीएमसी क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वाढला उच्छाद

  123

कल्याण : केडीएमसी क्षेत्रात मोकाट भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या काही दिवसांतील घटनामध्ये टिटवाळ्यात एका फिरस्त्या महिलेचे भटक्या मोकाट कुत्र्यानी शरीराचे लचके तोडले या हल्यात गंभीर जखमी असलेल्या महिलेवर जे-जे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतील ८ वर्षीय शाळकरी मुलावर मोकाट भटक्या कुत्र्याने झेप घेत केलेल्या हल्यात त्यांच्या ओठाला गुप्तांगाचा चावल्याची घटना पाहता आणि यापूर्वीही मोकाट व भटक्या कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या असल्यातरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासन करू शकत नाही हि शोकांतिका म्हणावी लागेल.


शहरातील भटक्या कुत्र्यांना प्रशासन आवर कसा घालणार असा प्रश्न ऐरणीवर आला आहे मनपा परिसरात स्टेशन लगतच्या रस्त्यावर रात्री येता जाताना १५ - २० कुत्र्यांचा कळप एकट्या दुकट्या माणसाला चहू बाजूनी घेराव घालतात. अशा प्रसंगी त्या माणसावर जीवावर आलेल्या प्रसंगातून बचावाशिवाय पर्याय नसतो. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमानुसार मनपा प्रशासनाचे काम आहे. परंतु भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीतील तथ्य म्हणजे काय तर नागरिकांच्या भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीनुसार प्रशासन वेळेनुसार डॉग व्हॅन पाठवून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची कारवाई करून जीवरक्षा अँनिमल वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत कल्याण पश्चिमेतील निर्बीजीकरण केंद्रात आणून नसबंदी केली जाते व अँन्टी रेबीज लस दिली जाते.



तसेच दररोज शिजविलेला भात चिकन दिले जाते. तीन दिवस त्या कुत्र्याला निरीक्षणाखाली ठेऊन त्याला पुन्हा चौथ्या दिवशी ज्या ठिकाणाहून पकडले असते त्या ठिकाणी सोडले जाते. या बद्दल त्या संस्थेला ९८९ रुपये एका भटक्या कुत्र्यामागे दिले जातात. तसेच भटक्या मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नासंदर्भात मनपाने नवीन काही अँक्शन प्लँन तयार केला आहे की असे विचारले असता आधिकारी यांनी नाही असे गुळमुळीत उत्तर दिल्याने मनपा क्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.


२०१२ च्या पशुगणनेनुसार क. डो. मनपा क्षेत्रात ५५ हजार इतकी श्वानाची संख्या होती. दर पाच वर्षोनी पशुगणना होते. गेली १० वर्षे होऊन पशुगणना झाली नसून कोवीडनंतर आता यंदा पशुसंवर्धन विभाग मार्फत पशुगणना करण्याचे काम सुरू असून आजमतीस सुमारे ८० हजार इतक्या श्वानांची संख्या आसावी असे समजते.


भटक्या मोकाट कुत्र्याची संख्या वाढते की घटते यांचे उत्तर वाढते की घटते यांचे उत्तर प्रशासन देऊ शकले नाही. 'क' वर्ग महापालिका असून तीन चार महिन्यापूर्वी एजन्सी मार्फत पशुवैद्यकीय आधिकारी उपलब्ध झाला असल्याचे पुढे आले असून बिंदूनमावलीनुसार पशुवैद्यकीय आधिकारी भरती होणार असल्याचे आधिकारी सुत्राकडून माहिती मिळाली. प्रशासनाची भटक्या कुत्र्यांची कारवाई होऊन देखील परिस्थिती जैसे से थे आहे.



आरोग्य विभागाची माहिती


१ जानेवारी २०२४ पासून ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत १२,४०६ भटक्या मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून यासाठी १ कोटी २२ लक्ष ६९ हजार ५३४ रू. खर्च झाला तरी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नाही. तसेच १ जानेवारी २०२४ ते ३१ आँक्टोबर मनपा क्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्यांनी चावलेल्या तसेच कुत्रा चावलेल्या रेबीज लसीकरण केलेल्या रूग्णांची संख्या १८ हजार ७०५ इतकी असून १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत १८,९३९ इतक्या जणांना कुत्रे चावल्याच्या तसेच रेबिज लसीकरण इंजेक्शन दिल्याची माहिती आरोग्य विभागातील कमलेश सोनवणे यांनी दिली.


Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या