Tuesday, February 11, 2025
Homeक्राईमShahaji Bapu Patil : सांगोला माजी आमदारांच्या कार्यालयाबाहेर दगडफेक; फॉर्च्युनर फोडली!

Shahaji Bapu Patil : सांगोला माजी आमदारांच्या कार्यालयाबाहेर दगडफेक; फॉर्च्युनर फोडली!

करारा जबाव मिलेगा, संतप्त शिवसैनिकांची पोस्ट

सोलापूर : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम संपला असला तरीही विरोधकांची टोलेबाजी सुरुच आहे. अशातच काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या पुतण्याच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Pune Crime : पुण्यात चाललंय काय! ४८ तासात ५ हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीवर एका अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी कार्यालयात शहजी बापूंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला. मात्र, दगड मारणारा तरुण पळून गेल्याने आता सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असून पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संपापले आहेत. तसेच, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असेही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून म्हटले आहे.

शिवसैनिकांचा करारा जबाव

‘जाहीर निषेध… करारा जबाव मिलेगा’. आज सांगोल्यात सागर पाटील यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचा जाहीर निषेध. पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने हल्लेखोराना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल , अशी सोशल मीडिया पोस्ट पाटील समर्थकांकडून करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -