Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीPushpa 2: 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी तोडला...

Pushpa 2: ‘पुष्पा २’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी तोडला ‘जवान’, ‘पठाण’चा रेकॉर्ड

मुंबई: अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ऑफ दी इयर ‘पुष्पा 2: द रूल’ (Pushpa 2 The Rule) अखेर चित्रपटगृहात रिलीज झालेला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडाधड कमाई करत आहे. ‘पुष्पा 2: द रूल’ बाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीज होताच या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांना मात दिली आहे.

‘पुष्पा 2: द रूल’ने ओपनिंग डेच्या कलेक्शनमध्ये बॉलिवूडचे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन स्टार सिनेमाने बॉक्स ऑफिसवर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत साधारण ९७.६५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

या कलेक्शनसह सिनेमाने पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई करणारे सिनेमे जवान, पठाण आणि अॅनिमल तसेच देवाराचा रेकॉर्ड तोडला आहे.

शाहरूख खानचा गेल्या वर्षी रिलीज झालेला सिनेमा जवानने पहिल्याच दिवशी ७५ कोटींचे कलेक्शन केले होते. तर पठाणने ५७ कोटी आणि रणबीर कपूरच्या अॅनिमलने ६३.८ कोटी रूपयांची ओपनिंग केली होती.

‘पुष्पा 2: द रूल’पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या जवळपास कमाई करण्याची शक्यता आहे. इतकंच की हा सिनेमा ओपनिंगमध्ये कल्की २८९८ आणि सालारलाही मागे टाकू शकतो. सुकुमार यांच्या दिग्दर्शनात बनलेला ‘पुष्पा 2: द रूल’ हा सिनेमा २०२१मध्ये झालेल्या पुष्पा सिनेमाचा सिक्वेल आहे. सिनेमात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना पुन्हा रोमान्स करताना दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -