Saturday, February 15, 2025
Homeमहत्वाची बातमीMaharashtra CM: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

Maharashtra CM: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

मुंबई:विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी चालली असून मुख्यमंत्री कोण? यावर उद्या, बुधवारी भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

महायुतीचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला 70 हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Eknath Shinde Health : शपथविधीची तयारी पण शिंदे पडलेत आजारी, उद्याच होणार सर्व घडामोडी

विशेष बाब म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील चारशेहून अधिक साधू-संतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय, विविध समाजाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेल्या संतांमध्ये जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज, गोविंददेव गिरी महाराज, बागेश्वर बाबा, महामंडलेश स्वामी विश्वेश्वरानंद महाराज, जैन संत लोकेश मुनी, बंजारा संत, शीख संत, बौद्ध भिक्खू यांचा समावेश आहे. याशिवाय काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आणि महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी, यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -