Railway Update : प्रवाशांना दिलासा! महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई : रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. अशातच रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Day) पश्चिम आणि मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Railway Update)



पश्चिम रेल्वेवर धावणार सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 


पश्चिम रेल्वेने (Western Railway) रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत  मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाड्यावर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.



कसे असेल वेळापत्रक?



  • ट्रेन क्रमांक ०९००१ भिवानी सुपरफास्ट स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी निघेल. ही ट्रेन ३ ते १७ डिसेंबरदरम्यान धावणार आहे.

  • ट्रेन क्रमांक ०९००२ ही गाडी भिवानी येथून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. ही ट्रेन ४ ते १८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

  • वांद्रे-उधना स्पेशलचा विस्तार ट्रेन क्रमांक ०९०५५ वांद्रे टर्मिनस-उधना स्पेशल यापूर्वी २८ नोव्हेंबरपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०५६ उधना-वांद्रे टर्मिनस स्पेशल या परतीच्या गाडीची मुदतही ३१ डिसेंबर वाढवण्यात आली आहे.


 मध्य रेल्वेवर तात्पुरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी


आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागातील काही प्रमुख स्थानकावर २ ते ९ डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रण करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या