सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात वीरा देसाई रोडवर रहिवाशी इमारतीत भीषण आग लागली आहे. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास या इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनियावर NADA ची कारवाई; चार वर्षांसाठी केले निलंबित!
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने इमारतीमधील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढणयात यश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे. दरम्यान, आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.