नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनियावर (Bajrang Punia) चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता अॅन्टि डोपिंग चाचणीसाठी नमुने देण्यास नकार दिल्याबद्दल बजरंग पुनियावर ही कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभा निकालानंतर महायुतीच्या विधान परिषदेतील ६ जागा रिक्त
यापूर्वीही नॅशनल अॅन्ट डोपिंग एजन्सी (NADA) आणि वर्ल्ड गव्हर्निंग बॉडी समितीने या कुस्तीवटूवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र नाडाच्या डोपिंग पॅनलच्या शिस्तपालन समितीने ३१ मे रोजी निलंबन रद्द केले होते. तर आता पुन्हा काल रात्री उशिरा बजरंग पूनियावर नाडाने ही कारवाई केली आहे.