Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीPresident Murmu : भारतीय राज्यघटना तीन वर्षाच्या विचारमंथनाचे फलित : राष्ट्रपती मुर्मू

President Murmu : भारतीय राज्यघटना तीन वर्षाच्या विचारमंथनाचे फलित : राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली : भारतीय संविधान लोकशाहीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त करुन संविधानाचे महत्व अधोरेखित केले. संविधान सदनाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे मंचावर उपस्थित होते.

Railway Updates: मुंबई-लातूर आणि बीदर एक्स्प्रेस डिसेंबरपासून कायमस्वरूपी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पंच्याहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदन’च्या याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेने राज्यघटना तयार करण्याचे कार्य पार पाडले. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सर्व नागरिकांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. पुढील वर्षी २६ जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करू. अशा उत्सवांमुळे एकात्मता मजबूत होते.

भारतीय राज्यघटना ही काही महान विचारवंतांनी केलेल्या सुमारे तीन वर्षांच्या विचारमंथनाचे फलित आहे. तसेच खऱ्या अर्थाने ते आपल्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्याचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका तसेच सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आपल्या घटनात्मक आदर्शांना बळ मिळते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. राज्यघटना हा जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -