Monday, May 18, 2026

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केल्यानंतर इंधनदर वाढीची शक्यता व्यक्त केली जात होती. आता ती भीती खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात ३ रुपये, तर डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) दरात ३.११ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून नवे दर लागू झाले असून देशभरातील विविध शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात ८७ पैशांची वाढ झाली असून आता प्रतिलिटर पेट्रोलचा दर १०७ रुपयांच्या पुढे गेला आहे. तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ झाली असून प्रतिलिटर डिझेल ९४ रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्येही इंधनदरात वाढ झाली आहे. (Petrol Diesel Price Hike)

इराण-अमेरिका आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी उसळी आली आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला असून त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारने इंधनदरवाढीचा काही भार नागरिकांवर टाकल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. (Petrol Diesel Price Hike)

दरम्यान, अवघ्या काही दिवसांत सलग दुसऱ्यांदा इंधनदर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमतीवरही परिणाम होऊ शकतो. (Petrol Diesel Price Hike)

आजचे प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर :

दिल्ली – ₹९८.६४ (+₹०.८७) कोलकाता – ₹१०९.७० (+₹०.९६) मुंबई – ₹१०७.५९ (+₹०.९१) चेन्नई – ₹१०४.४९ (+₹०.८२)

आजचे प्रमुख शहरांतील डिझेलचे दर :

दिल्ली – ₹९१.५८ (+₹०.९१) कोलकाता – ₹९६.०७ (+₹०.९४) मुंबई – ₹९४.०८ (+₹०.९४) चेन्नई – ₹९६.११ (+₹०.८६)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >