मुंबई : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी (Railway Updates) मुंबई-लातूर (Mumbai-Latur) आणि मुंबई-बीदर (Bidar Express) या दोन गाड्यांचा विस्तार डिसेंबर महिन्यापासून कायमस्वरूपी करण्याचे ठरविले आहेत. डिसेंबर महिन्यापासून या दोन्ही गाड्या अतिरिक्त डब्यांसह चालणार आहेत.
सोलापूर विभागातून जाणाऱ्या मुंबई-लातूर व मुंबई- बीदर या दोन एक्स्प्रेसचा कायमस्वरूपी विस्तार करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ आणि २२१४३/२२१४४ यामध्ये कायमस्वरूपी तीन अतिरिक्त डब्यांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना दोन अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि एक अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच जोडण्यात येणार आहेत.
जुने पॅनकार्ड होणार बाद! आता मिळणार क्यूआर कोड असलेले नवे कार्ड; मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय
ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – लातूर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. १ डिसेंबरपासून आणि लातूर येथून ता. २ डिसेंबरपासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच
ट्रेन क्रमांक २२१४३/२२१४४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – बीदर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. ४ डिसेंबरपासून आणि बीदर येथून ता. ५ पासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच.