Monday, February 17, 2025
Homeक्रीडाAUS vs IND: षटकारासह यशस्वीचे दमदार शतक, भारताकडे अडीचशे पार आघाडी

AUS vs IND: षटकारासह यशस्वीचे दमदार शतक, भारताकडे अडीचशे पार आघाडी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(AUS vs IND) यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू झाला आहे.आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने अडीचशेच्या जवळपास आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवालने षटकार ठोकत शतक पूर्ण केले. यासोबतच देवदत्त पड्डिकलही खेळपट्टीवर टिकून आहे.

यशस्वी जायसवालने २०६ बॉलमध्ये ८ चौकार आणि ३ षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपला षटकार ठोकत शतकी सलामी दिली.

भारतीय संघाने गेल्या २ दौऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात हरवले होते. यावेळेस हॅटट्रिकची संधी आहे. या महामालिकेत एकूण ५ सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेतील पुढील कसोटी सामना ६ डिसेंबरला अॅडलेडमध्ये होणार आहे.

पर्थ कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करतआहे. दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात कोणताही विकेट न गमावता १७२ धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या डावात भारताला पहिला झटका केएलच्या रूपात बसला. त्याने ७७ धावा केल्या.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -