ACC Women's Premier Cup 2026 : महिला टी-20 आशिया कप पात्रता स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात UAE ने अवघ्या 5 चेंडूंमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला आहे. या शानदार विजयामुळे UAE संघ महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
ACC Women's Premier Cup 2026: UAE begin their tournament campaign with a 10-wicket win over Saudi Arabia 🇦🇪👏 Scores in brief: Saudi Arabia: 27 all out, 15.3 overs (Mashael Waqas 9; Heena Hotchandani 3-4, Suraksha Kotte 3-5, Esha Oza 3-9) UAE: 30 for no loss in 0.5 overs (Esha… pic.twitter.com/KCzAP9FSl5
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) June 3, 2026
UAEच्या गोलंदाजांसमोर सौदी अरेबियाची समर्पण
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सौदी अरेबियाचा संपूर्ण संघ UAE च्या आक्रमक गोलंदाजीसमोर पूर्णपणे फिका पडला. सुरुवातीच्या षटकांपासूनच विकेट्स पडायला लागल्या त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सौदी अरेबियाने निर्धारित षटकांमध्ये केवळ 27 धावा केल्या. विशेष म्हणजे संघातील पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. त्यामुळे UAE समोर अत्यंत सोपे लक्ष्य उभे राहिले. सुरक्षा कोट्टे,हीना होटचंदानी आणि कर्णधार ईशा ओझा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत सौदी अरेबियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगड येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख ...
फक्त 5 चेंडूंमध्ये लक्ष्य गाठण्याचा विक्रम
28 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या UAE ने वेळ न दवडता आक्रमक फलंदाजी केली. कर्णधार ईशा ओझा हिने केवळ 5 चेंडूंमध्ये 15 धावांची तुफानी खेळी केली, तर थीर्था सतिश 4 धावांवर नाबाद राहिली. यामुळे UAE ने केवळ 5 चेंडूंमध्ये सामना जिंकत महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक अनोखा विक्रम केला. सर्वात जलद लक्ष्य गाठण्याच्या यादीत UAE चौथ्या स्थानावर आली आहे.शिल्लक राहिलेल्या चेंडूंच्या आधारावर हा महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील चौथा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी रवांडा,टांझानिया आणि थायलंड यांनी याहून जलद लक्ष्याचा पाठलाग करत विक्रम नोंदवले होते. या एकतर्फी विजयामुळे UAEने स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. संघाचा नेट रनरेट तब्बल +34.650 इतका झाला आहे. यासह गुणतालिकेत UAE अव्वल स्थानी पोहोचली आहे. त्यामुळे आशिया कप पात्रता स्पर्धेत UAEचा दावा अधिक मजबूत झाला आहे.





