मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra assembly election 2024) निकाल जाहीर होत आहेत. राज्यात महायुतीला बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. अनेक मतदारसंघाचे निकाल हाती आले आहेत. राज्यात आतापर्यंत विजयी झालेले हे उमेदवार आहेत.
श्रीवर्धन येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना विजय मिळाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अनिल नरवणे यांना हरवले.
ठाणे येथील प्रतिष्ठित कोपरी-पाचपाखाडी हा गड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. एकनाथ शिंदे या मतदारसंघातून भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे केदार दिघे उभे होते.
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रफुल्ल गुद्धे यांना हरवले.
मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवर सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी जिंकला आहे. अपक्ष उमेदवरा बापूसाहेब भेगडे यांना त्यांनी हरवले.
जळगावच्या जामनेर मतदारसंघात भाजपचे गिरीश महाजन यांना मोठा विजय मिळवला आहे. येथे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप खोडपे उभे होते.
कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे यांचा जबरदस्त विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांचा पराभव झाला आहे.
वडाळा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांना हरवले.
परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी ५० हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.
कसबा मतदारसंघातून भाजपा पक्षातील हेमंत रासने यांचा बहुमताने विजय झाला आहे. तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.
कसबा मतदारसंघातील उबाठा गटाचे अमित कदम यांचा पराभव करत भाजपा पक्षाचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले आहेत.
सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीमधील उबाठा गटाचे राजन तेली यांना हरवले.
कुडाळ मतदारसंघातून शिंदेसेना गटाचे निलेश राणे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. तर उबाठा गटातील वैभव नाईक यांचा पराभव झाला आहे.
कागल मतदार संघातून राष्ट्रवादी कॉँग्रेस गटाचे हसन मुश्रीफ यांचा जबरदस्त विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातील समरजित घाटगे यांना हरवले.
बारामती मतदार संघातून राष्ट्रवादी कॉँग्रेस गटाचे नेते अजित पवार यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील युगेंद्र पवार यांचा पराभव झाला.
मालेगाव बाह्य मतदार संघातून शिवसेना गटाचे दादाजी भुसे विजयी झाले आहेत. तर उबाठा गटाचे अव्दय हिरे यांचा पराभव झाला.
बारामती मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रशांत यादव यांना पराभूत करुन राष्ट्रवादी कॉँग्रेस गटाचे शेखर निकम विजयी झाले आहेत.
अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेना गटातील मुरजी पटेल यांचा विजय झाला आहे. यांच्या विरुद्ध उबाठा गटातून ऋतुजा लटके उभ्या होत्या.
येवला मतदार संघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून छगन भुजबळ यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. तर शऱद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचा पराभव झाला आहे.
शिवडी मतदार संघातून उबाठा गटातून अजय चौधरी विजय झाले आहेत. तर मनसेचे बाळा नांदगावकर पराभूत झाले असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
बेलापूर मतदार संघातून शरद पवार गटाचे संदीप नाईक हे पराभूत झाले असून भाजपा पक्षाचे मंदा म्हात्रे यांचा विजय झाला आहे.
वरळी मतदार संघातून उबाठा गटातून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. यांच्या विरोधात शिवसेना गटातून मिलिंद देवरा आणि मनसे गटातून संदीप देशपांडे उभे होते.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निशिकांत पाटील यांचा पराभव झाला आहे.
कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपा पक्षाचे सुलभा गायकवाड या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. तर उबाठा गटातील धनंजय बोराडे यांचा पराभव झाला आहे.
संगमनेर मतदार संघातून शिवसेना गटाचे नेते अमोल खताळ यांचा विजय झाला आहे. तर विरोधात उभे असणारे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय थोरात पराभूत झाले आहेत.
भायखळा मतदार संघातून उबाठा गटाचे उमेदवार मनोज जामसुतकर विजयी झाले असून शिवसेना गटातील यामिनी जाधव पराभूत झाल्या आहेत.
नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजपा गटाचे सीमा हिरे विजयी झाल्या असून उबाठा गटातील सुधाकर बडगुजर पराभूत झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओगले विजयी झाले असून शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे पराभूत झाले आहेत.
कांदिवली पूर्व मतदारसंघातून भाजपा पक्षाचे अतुल भातखळकर विजयी झाले आहेत.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार एडवोकेट राहुल ढिकलें हे पुन्हा एकदा विजय झाले आहेत.
कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपा पक्षाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूर करयत विजम मिळवला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातील रोहित पवार विजयी झाले असून भाजपाचे राम शिंदे यांचा पराभव झाला आहे.
कुलाबा मतदार संघातून भाजपा पक्षाचे राहूल नार्वेकर विजयी ठरले आहेत. तर काँग्रेसमधील हिरा देवासी पराभूत झाले आहेत.
उबाठा गटातील बाळ माने यांचा पराभव करत शिवसेना गटाचे उदय सामंत यांना घवघवीत यश मिळाले आहे.
महाड मतदार संघातून शिवसेना गटातील भरत गोगावले विजयी झाले आहेत. तर स्नेहल जगताप यांचा पराभव झाला आहे.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…