जळगाव : काल राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले. अशावेळी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक इलेक्शन ड्यूटीमध्ये (Election Duty) व्यस्त असतात. मात्र त्याचदरम्यान जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाचा इलेक्शन ड्यूटीहून परतताना भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
UP Accident : उत्तर प्रदेशात ट्रक अन् खासगी बसची जोरदार धडक; अपघातात ५ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी!
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे इलेक्शन ड्यूटीवरुन त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी जात होते. मात्र यादरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, लक्ष्मीकांत पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.