Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीUP Accident : उत्तर प्रदेशात ट्रक अन् खासगी बसची जोरदार धडक; अपघातात...

UP Accident : उत्तर प्रदेशात ट्रक अन् खासगी बसची जोरदार धडक; अपघातात ५ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP News) अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात (UP Accident) घडल्याची बातमी समोर आली आहे. एका खासगी डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.

Palghar MIDC Fire : पालघर एमआयडीसीमधील कारखान्याला भीषण आग!

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Express Way) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दिल्लीहून आजमगढला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने ट्रकला मागून धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. तर प्रवाशांनी चालक नशेत होता असेही म्हटले आहे. मात्र त्यावर जखमी कंडक्टरने चालक नशेत नव्हता असा दावा केला आहे.

जखमींची माहिती

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पाच महिन्याचे बाळ, एक महिला आणि तीन पुरुष यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ११ महिन्यांची चिमुकली, एक लहान मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, तीन महिला आणि ९ पुरुष आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी रेस्क्यू करत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

मुख्यमंत्री योगींनी दिल्या सूचना

अलिगढ दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावी अशा आशा व्यक्त केली आहे. (UP Accident)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -