नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अडचणीतून सावरलेला अदानी समूह (Adani Group) पुन्हा गोत्यात आला आहे. आज शेअर उघडताच सर्व स्टॉक धडाधड कोसळल्याचे (Stock Fall) दिसून आले. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर लाच आणि फसवणूकीच्या आरोपामुळे (Fraud Case) याचा जोरदार फटका अदानी समूहाच्या शेअर्सला (Adani Group Stock) बसला आहे.
समूहातील सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर २० टक्क्यांनी घसरून ६९७.७० रुपयांवर आला आणि शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे याचा मोठा झटका गुंतवणूक दारांनाही बसला आहे.
अदानी यांच्यावर सौर प्रकल्पांचे कंत्राट आणि वित्तपुरवठा करण्यासाठी मोठी लाच दिल्याचा आरोप असून त्यांनी ही बाब अमेरिकन गुंतवणूकदारांपासून लपवली आहे. त्यामुळे अमेरिका न्यायालयाने गौतम अदानी यांना लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोपाखाली दोषी ठरवले आहे. या संपूर्ण प्रकरणात अदानी यांचा पुतण्या आणि अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी आणि कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्यासह अन्य आरोपी आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…