तिरुपती देवस्थान मंडळाने घेतला निर्णय
अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात (Tirupati Balaji Temple) नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी भाविकांना २० ते ३० तास लागतात. मात्र आता अवघ्या काही तासातच भाविकांना दर्शन (Tirupati Balaji Darshan) मिळण्यासाठी तिरुपती देवस्थान मंडळाने (Tirupati Devasthanam Trustee) निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिर मंडळाने विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे नवीन व्यवस्थेअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तिरुपतीच्या स्थानिक नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना अवघ्या २ तासांत व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान, विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्यात येणार आहे. व्हीआयपी दर्शनाबाबत वाद कायम असून, यावर आणखी प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी मंडळाचे सदस्य श्यामला राव यांनी सांगितले. (Tirupati Balaji Darshan)