नवी दिल्ली : देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर (NEET Paper Leak 2026) केंद्र सरकार आता मोठी आणि कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी आगामी नीट परीक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी थेट भारतीय लष्कराकडे (Indian Army) सोपवण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सूत्रांकडून समजते.
विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती
मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प आता नव्या टप्प्यात दाखल झाला आहे. ...
या संदर्भात दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक सुरू असून, त्यात शिक्षण मंत्रालय, गृहमंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाल्याची माहिती आहे. प्रश्नपत्रिका छपाईपासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत लष्कराच्या गोपनीय आणि अत्याधुनिक सुरक्षा पद्धतींचा वापर करण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. (NEET Paper Leak 2026)
दरम्यान, दुसरीकडे सीबीआयने (CBI) पेपरफुटी प्रकरणात तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून, अटक आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अलीकडील दोन्ही अटक महाराष्ट्रातून झाल्याने राज्यातील कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. (NEET Paper Leak 2026)
Kalyan Durgadi Protest : कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर तणाव; नमाजविरोधात भाजप-शिंदे गटाचं आंदोलन
कल्याण : कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक वाद उफाळून आला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण ...
सीबीआयने लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. तपासात त्यांनी रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप समोर आला आहे. तसेच पुण्यातील ‘APMA’ कोचिंग इन्स्टिट्यूटमधील भौतिकशास्त्राचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांनाही अटक करण्यात आली आहे. तपासात धक्कादायक माहिती उघड झाली असून, तेजस शाह याने आरोपी मनिषा हवालदारकडून मिळालेल्या लीक प्रश्नपत्रिकेचा संपर्क मोबाईलमध्ये ‘GOD’ या नावाने सेव्ह केला होता. (NEET Paper Leak 2026)
या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह देशभरातील तब्बल 49 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन, हार्डडिस्क आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. (NEET Paper Leak 2026)
Bihar Boat Accident News : हळहळ! १४ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू, अनेकजण अद्याप बेपत्ता
पाटणा : बिहारच्या बरह उपविभागातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास प्रसिद्ध अशा उमानाथ गंगा घाटावर (Umnath Ganga) प्रवाशांनी ...
तपासात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच लीक झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून देशभर पसरलेल्या आंतरराज्यीय रॅकेटचे जाळे असल्याचा संशय अधिक बळावला आहे. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केंद्र सरकार आता परीक्षा प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. (NEET Paper Leak 2026)