Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीNaga Chaitanya : नागा चैतन्य पुन्हा अडकणार लग्नबंधनात!

Naga Chaitanya : नागा चैतन्य पुन्हा अडकणार लग्नबंधनात!

‘या’ तारखेला करणार शोभितासोबत लग्न

मुंबई : साऊथ चित्रपटसृष्टीचा (South Film Industry) अभिनेता नागा चैतन्यचा (Naga Chaitanya) सामंथासोबत (Samantha Prabhu) घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलीपालासोबत (Sobhita Dhulipala) लग्न करणार असल्याचे समजताच बराच काळ चर्चेत राहीला होता. चार महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. आता ते लवकरच लग्नबंधनात (Marriage) अडकणार आहेत. लग्नाची तारीख समोर आली असून त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Tu Hi Re Maza Mitwa : स्टार प्रवाहवर येणार आणखी नवी मालिका!

नागा चैतन्य आणि शोभिता ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. कुटूंबीय आणि मित्र-मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा विवाह पार पडणार आहे.

‘आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतोय कि, शोभिता आणि नागा चैतन्य लग्न करत आहेत. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या.’ असे लग्नाच्या पत्रिकेत लिहिण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -