प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणतात…
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) काही जुन्या मालिका लवकरच प्रेक्षकांचं निरोप घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहने आई बाबा रिटायर होतायत’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम ‘या नव्या मालिकेची घोषणा केली. त्यानंतर आता पुन्हा एका मालिकेची (New Marathi Serial) घोषणा केली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘तू ही रे माझा मितवा’ (Tu Hi Re Maza Mitwa) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमोने शेअर करण्यात आला असून या मालिकेत अभिनेता ‘अभिजीत आमकर‘ (Abhijit Amkar) आणि अभिनेत्री ‘शर्वरी जोग‘ (Sharvari Jog) प्रमुख भूमिकेत दिसणार. मात्र या मालिकेचा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी या मालिकेला ‘इस प्यार को क्या नाम दु’ या हिंदीतील मालिकेचा रिमेक दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ (Tu Hi Re Maza Mitwa) मालिका २३ डिसेंबर, रात्री १० वाजून ३० मिनिटांनी स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही मालिका आल्यानंतर आता अबोली मालिका संपणार की मालिकेची वेळ बदलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram