मुंबई : बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मंदिर यासारख्या गर्दीच्या ठिकाणी अनेक लहान मुले हरवली (lost children) जातात. तसेच गैरप्रकारासाठी देखील काही मुलांना पळवून आणले जाते. यासाठी पोलीस प्रशासनाकडून ‘ऑपरेशन मुस्कान‘ (Operation Muskaan) या पथकाची सुरुवात झाली. त्यामुळे हरवलेल्या किंवा पालकांपासून दुरावलेल्या अनेक मुलांचा शोध घेण्यास या पथकाची मदत होत आहे. तसेच मध्य रेल्वेच्या (Central Railway) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते‘ (Operation Nanhe Farishte) अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) हरविलेल्या ८६१ बालकांची पालकांशी पुर्नभेट घडवून आणली आहे.
मध्य रेल्वेने, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’च्या माध्यमातून आरपीएफने हरविलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यामध्ये ५८९ मुले तसेच २७२ मुलींचा समावेश आहे.
Children’s Day 2024: दरवर्षी १४ नोव्हेंबरलाचं का साजरा केला जातो बालदिन? जाणून घ्या
मुलांसह पालकांसाठी आरपीएफ सेवा देवदूत बनून आली असल्यामुळे सर्वत्र या सेवेबद्दल गोड कौतूक व्यक्त होत आहे. (Central Railway)