वर्षभरातील ३६५ दिवसांचा अभ्यास केला तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतंच त्यापैकीच एक दिवस म्हणजे १४ नोव्हेंबर. देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. बालदिन हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबरला गुरुवार आला आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचं लहान मुलांवर खूप प्रेम होतं, नेहरूजींना मुलेही चाचा नेहरू असं म्हणत असत. चाचा नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो?
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनुषंगाने १९५६ पासून २० नोव्हेंबर रोजी बालदिन हा ‘युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे’ म्हणून साजरा करण्यात येत होता. मात्र भारतात ७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्याच वर्षी १४ नोव्हेंबर संसदेत हा बालदिन म्हणून साजरा करण्याची एकमताने घोषणा करण्यात आली, तेव्हापासून भारतात बालदिन १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे.
Swiggy Share Outlook : स्विगीचा हिस्सा १६ टक्के कमी होईल की २० टक्के वाढेल?
जवाहरलाल नेहरूंचे मुलांच्या शिक्षणात योगदान
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असताना त्यांनी मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी खूप योगदान दिलं. जवाहरलाल नेहरू शिक्षण क्षेत्रात त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. नेहमीच जवाहरलाल नेहरू मुलांच्या शिक्षणाबाबत जनजागृती करत असे.
बालदिनाचे महत्त्व आणि इतिहास
देशात पंतप्रधान या नात्याने नेहरूंना असे वातावरण निर्माण करायचे होते जिथे मुलांवर आणि त्यांच्या कल्याणाकडे लक्ष दिले जाईल. १९५५ मध्ये त्यांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाची स्थापना केली जेणेकरून भारतीय मुलांना त्यांचे प्रतिनिधित्व पाहता येईल. पंडित नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) मृत्यूनंतर, त्यांची जयंती ही भारतातील बालदिनाची तारीख म्हणून निवडली गेली.