मुंबई: तुम्हीही रात्री उशिरापर्यंत फोन स्क्रोल करत राहता का? याचे उत्तर हो असेल तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम, खाणे-पिणे तसेच मानसिक फिटनेस जितका महत्त्वाचा आहे तितकीच गरजेची आहे झोप(Sleep). जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले राखायचे आहे तर रात्रीच्या वेळेस चांगली झोप घेणे तसेच वेळेवर झोपणे गरजेचे असते.
अनेक रिसर्चमधून हे समोर आले आहे की जे लोक रात्री १० वाजेपर्यंत झोपतात त्यांना मूडशी संबंधित समस्या होतात. चिडचिडेपणा, राग लवकर येणे ही सामान्य लक्षणे आहेत. खरंतर, आपल्या झोपेचे एक वर्तुळ असते जर आपले शरीर आणि मेंदूला त्यांच्या हिशेबाने आराम दिला नाही गेला तर यामुळे झोपेची सायकल बिघडते. त्यामुळे डॉक्टरांच्या मते १० ते ११ दरम्यान झोपले पाहिजे. १२ पर्यंत जागे राहण्याची सवय अनेक आजारांना वाढवू शकते.
यामुळे शरीरात फॅट वाढते. मेटाबॉलिज्म स्लो झाल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. यामुळे डायबिटीज, हृदयाचे प्रॉब्लेम आणि पचनासंबंधित समस्या येतात.