बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर चांगलीच टीका करताना दिसत आहेत. जसा-जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराचा वेग वाढत चालला आहे. राज्याचे प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. अशातच आता राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बारामतीत अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांसोबत असणाऱ्या त्यांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. फोनवर बोलत असताना अजित पवारांनी स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबांनो…सगळ्या बॅगा तपासा…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार (Ajit Pawar) अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.
अजित दादांच्या बॅगेत
चकली चिवडा अन् लाडू
.
.#ajitpawar #airportchecking #bagchecking #prahaarnewsline #prahaarnewsline #ajitpawar pic.twitter.com/qu2j5hhU1n— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 13, 2024
उद्धव ठाकरेंच्या दोनदा बॅगा तपासल्या
लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली होती. वणी येथेही दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. लातूर जिल्ह्यामधील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. माझ्या बॅग तपासा…पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बॅग का तपासत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत विचारला.
देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर ५ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावेळीचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे.