Sadhvi Pragya : काँग्रेसचं हे टॉर्चर; साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी भोपाळमधील भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर (Sadhvi Pragya Thakur) यांचा एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला असून १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र अशातच साध्वी प्रज्ञा यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांच्या सूज आलेल्या चेहऱ्याचा एक फोटो एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये 'काँग्रेसचं टॉर्चर हे फक्त एटीएसच्या कोठडीपुरते मर्यादित नाही. माझ्यासाठी या आयुष्यभराच्या मरण यातना आहेत. मेंदूला सूज, डोळ्यांनी कमी दिसणं, कमी ऐकू येणं, बोलण्यात एकसारखेपणा नसणं या सगळ्या गोष्टी मी सहन करते आहे. स्टेरॉईड आणि न्यूरो संबंधीच्या औषधांनी माझं सगळं शरीर सुजलं आहे. एका हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार सुरु आहेत. मी जर जगले वाचले ना तर न्यायालयात नक्की जाईन' असे त्यांनी म्हटले आहे.





दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांचा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. परंतु सध्या त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे जामीन देण्यात आला आहे. मात्र  न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना १३ नोव्हेंबर रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.


?si=UbTMV3mifUqmCngS
Comments
Add Comment

देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन ‘या’ राज्यात मिळते

भारतातील २०२५ मधील आर्थिक स्थिती पाहाता वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दैनंदिन वेतनात मोठी

वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी तिघांना अटक

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर जेवण्यासाठी बाहेर जात असताना बलात्कार करण्यात

चीनच्या सीमेसंदर्भात नेहमीच आम्ही दक्ष : लष्करप्रमुख अनिल चौहान

उत्तराखंडची सीमा जरी सध्या शांत असली, तरी चीनच्या सीमेसंदर्भात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे", असे चीफ ऑफ डिफेन्स

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट ४ नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय

घरूनच भरता येणार शाळेची फी ! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि पालकांसाठी सोयी

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी