महाविकास आघाडीचा घोषणांचा पाऊस, महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार रूपये

Share

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यातच बुधवारी महाविकास आघाडीने आपल्या पाच घोषणा जाहीर केल्या आहेत. यात महिलांना दर महा आर्थिक साहाय्य, कुटुंबासाठी आरोग्य विमा यांचा समावेश आहे.

खरंतर, महाविकास आघाडीमध्ये सामील पक्ष-काँग्रेस, शिवसेना(उद्धव ठाकरे), एनसीपी(शरद पवार) या नेत्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन केले. यात सर्व नेते सामील झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दरम्यान निवडणुकीसाठी आपले संकल्प पत्र जारी केले आहे.

या आहेत पाच घोषणा

महालक्ष्मी – महिलांना दरमहा ३ हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी वाहनांमध्ये मोफत प्रवास.

कृषी समृद्धी – संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कृषी कर्ज माफ केले जाईल. याशिवाय सातत्याने कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

युवकांना शब्द – महाराष्ट्रातील दर बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार रूपयांचे मासिक सहाय्य प्रदान केले जाईल.

कुटुंब रक्षण – महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना २५ लाख रूपयांचा आरोग्य विमान प्रदान केला जाईल. सरकारी रुग्णालयात आवश्यक औषधे मोफत प्रदान केली जातील.

समानतेची हमी – महाराष्ट्रात सामाजिक-आर्थिक जाती जनगणना आयोजित केली जाईल.

२० नोव्हेंबरला होणार मतदान

महाराष्ट्रात यंदा २८८ विधानसभेच्या जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, एनसीपीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.

Recent Posts

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

2 minutes ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

13 minutes ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 hours ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

3 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

3 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

3 hours ago