Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीआजपासून खायला सुरूवात करा या गोष्टी, कधीच येणार नाही व्हिटामिन बी, बी१२ची...

आजपासून खायला सुरूवात करा या गोष्टी, कधीच येणार नाही व्हिटामिन बी, बी१२ची कमतरता

मुंबई: व्हिटामिन बी१२ हे अत्यंत गरजेचे पोषकतत्व आहे जे शरीराच्या विवइध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. लाल रक्तपेशींचे उत्पादन, हेल्दी नर्व्हस सिस्टीम आणि डीएनएच्या कामांसाठी गरजेचे आहे.

कारण आपले शरीर स्वत:हून बी १२ ची निर्मिती करत नाही. यासाठी आपल्या आहारातून बी१२चा शरीराला पुरवठा करणे गरजेचे असते. व्हिटामिन बी१२ची मात्र ३००Pg/ml पेक्षा जास्त असणे नॉर्मल मानले जाते. जेव्हा हा स्तर सातत्याने की होतो तेव्हा व्हिटामिन बी १२ची कमतरता मानली जाते. जर वेळेवर याकडे लक्ष दिले नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळे हात-पाय सुन्न होतात. तसेच चेहरा पिवळा पडणे, स्किन ड्राय होणे तसेच स्मरणशक्ती कमी होणे, स्वभाव चिडचिडा होणे यासारखी लक्षणे दिसतात.

कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात बी१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते. मात्र शाकाहारी लोकांच्या शरीरात बी१२ची कमतरता अधिक आढळते.

बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी डेअरी पदार्थ जसे दूध, दही आणि पनीर हा व्हिटामिन बी१२चा चांगला स्त्रोत आहे. आपल्या दररोजच्या डाएटमध्ये सामील करून तुम्ही व्हिटामिन बी१२ची कमतरता भरून काढू शकता.

सीवीड्समध्येही व्हिटामिन बी१२ असते. जपानी आणि कोरियन खाण्यामध्ये सीवीड्सचा समावेश अधिक केला जातो.

टीप – वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही. संबंधित गोष्टींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -